रुखवत स्पेशल
रुखवत म्हणजे नक्की काय?
रुखवत म्हणजे नववधूने माहेरून येताना सोबत आणलेली संस्कृती. वेगवेगळ्या वस्तूंचा अतिशय कुशलतेने व योग्य पध्दतीने वापर करून बनवलेल्या वस्तू म्हणजे रुखवत. विवाहप्रसंगी हे रुखवत एका बाजूला मांडलेले असते, परंतु तरीदेखील तो एक आपुलकीचा विषय असतो. लग्न हा कुठल्याही मुलीच्या आयुष्यातला एक फार मोठा टप्पा आहे. लग्नानंतर मुलीचे अख्खे जगचं बदलून जाते, कारण नवीन घरातली प्रत्येक गोष्टच तिच्यासाठी नवीन असते. त्यामुळेच मुलीसोबत तिच्या संसाराला उगयोगी पडतील अशा वस्तू देण्याची पद्धत रूढ झाली.त्याचबरोबर ते देताना त्याचे प्रदर्शन म्हणून रुखवत मांडण्याची प्रथा रूढ झाली.ही पध्दत केवळ मराठी कुटूंबामध्येच नव्हे तर इतर प्रांतात, इतर धर्मात देखील निरनिराळ्या नावांनी अस्तित्वात आहे हे ही नसे थोडके.
सुरुवातीच्या काळात केवळ मुलीने बनवलेल्या वस्तूच रुखवतात ठेवल्या जायच्या. पण हळूहळू मुलीसोबतच मुलीची आई, काकू, मैत्रिणी, नातलग इ. हौशी मंडळींचीही त्यात भर पडत गेली. आणि या साऱ्यांनी बनवलेल्या वस्तूदेखील रुखवतात हजेरी लावू लागल्या. यात लोकरीचे विणलेले तोरण, नाण्यांनी बनवलेले जहाज, पापड, करंज्या, लाडू, कृत्रिम फुले, एखादे घरी तयार केलेले वॉल हँगिंग इ. समाविष्ट होते. हल्ली मुलीचे लहानपणापासून ते लग्नपर्यंतची क्षणचित्रे म्हणजे अर्थातच फोटो रुखवतात मांडलेले असतात.
हल्लीच्या मुलींना रुखवत तयार करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही, आणि त्याला कारणही तसेच आहे. कारण हल्ली मुली शिक्षण आणि त्यानंतर जॉब अशा चक्रात अडकलेल्या असतात. त्यामुळे त्यांना रेडिमेड रुखवत जास्त सोयीस्कर ठरते. कारण त्यात काही मेहेनत करावी लागत नाही. फक्त ऑर्डर दिली की काम झाले. रुखवत अगदी घरपोच तुमच्या हातात.
खालील बटनावर क्लिक करून आमचे प्रॉडक्ट्स पाहून घ्या.